शिक्षण क्षेत्राला दिशा देण्यात स्व.मधुकरराव चौधरींचे मोठे योगदान

शरद महाजन : धनाजी नाना महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप


फैजपूर : वाणिज्य शाखेतील संशोधक प्राध्यापकांनी व्यवस्थापनातील त्रृटींवर अभ्यास करून देशाला आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने नवीन तंत्र विकसित करण्यासाठी संशोधन करण्याची आवश्यकता असून शिक्षण क्षेत्राला दिशा देण्यात स्व.मधुकरराव चौधरी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन न्हावी वैद्यकीय आणि तंत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन यांनी येथे व्यक्त केले. धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी तापी परीसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष के.आर.चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरविंद चौधरी होते. प्रास्ताविक द्वि-दिवसीय ‘राष्ट्रीय परिषदेचे’ समन्वयक उपप्राचार्य डॉ ए.आय.भंगाळे यांनी केले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व तापी परिसर विद्यामंडळाच्या कार्यकारी मंडळाने राष्ट्रीय परीषदेच्या आयोजनासाठी सहमती देत सर्वोतोपरी सहकार्य केले त्याबद्दल आभार मानले,

विविध पुरस्कार जाहीर
यावेळी डॉ.जी.वाय.शितोडे यांनी विविध पुरस्कार जाहीर केले. त्यात प्राचार्य डॉ.माधवी कुलकर्णी यांना डॉ.पी.सी.शेजवलकर आणि महादेव तल्हार ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, प्रा.अशोक कोकाटे यांना ‘सौरव शिवरे स्मृती तरुण संशोधक पुरस्कार’, डॉ.अशोक कोकाटे व डॉ.निषेश विलेकर यांना ‘वप्नील ललवाणी स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट संशोधक व आलेख वाचक’ पुरस्कार देण्यात आला तसेच डॉ.पी.एम.शहा व डॉ. बी.व्ही.नाईक यांना ‘लोकसेवक मधुकरराव चौधरी स्मृतीप्रित्यर्थ जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात आला. प्रसंगी महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.जी.एम.तल्हारे, अध्यक्ष बी.बी.तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ.आर.के.टेलर, सचिव डॉ.जी.वाय.शितोडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
अहवाल वाचन प्रा.डॉ.श्याम साळुंके यांनी केले. डॉ.पी.वाय.कालवरकर, डॉ.निशीकांत झा, डॉ.संजय रामराजे यांनी परीषदेच्या आयोजनाविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन डॉ.राजश्री नेमाडे, डॉ.आर.आर.राजपूत, डॉ.सीमा बारी यांनी व आभार डॉ.जी.जी.कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !