जुन्या आठवणींमध्ये रमले विद्यार्थी
वरणगावात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
वरणगाव : श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात मार्च एसएससी 2000 च्या विद्यार्थ्यांचा प्रथम वार्षिक स्नेहमेळावा नुकताच उत्साहात झाला. यावेळी जुन्या आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळाही दिला. वरणगाव येथील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात 19 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला.
यांची होती उपस्थिती
माजी मुख्याध्यापक सी.एस.अवतारे, माजी मुख्याध्यापक आर.आर.महाजन, विद्यमान मुख्याधापक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एल.नेमाडे, एस.के.बेंडाळे, ए.ई.पाटील, एन.पी.पाटील, ए.ई.खाचणे, एस.टी.जावळे, बी.ए.पाटील, व्ही.वाय.चौधरी, एस.के.पाटील, ए.बी.सपकाळे, ए.एम.पाटील, ए.एस.देशमुख, सुनील शिंदे, राजू देवघाटोळे, कूरकूरे अप्पा, एस.डी. कापसे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी एस.एल.नेमाडे यांनी विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. सूत्रसंचालन भाग्यश्री बोरोले व सुजीत जगदाळे तर आभार शरद पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रीतेश रुणवाल, विनोद खोले, राहुल पाटील, देवेंद्र फिरके, चेतन पाटील, भूषण पाटील, एजाज शेख, शरद पाटील, सुजित जगदाळे, अमोल भारंबे, निलेश पाटील यांनी परीश्रम घेतले.



