साप्ताहिक अतिजलद गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून मुदतवाढ


भुसावळ : उन्हाळी सुट्यांचे दिवस लक्षात घेता रेल्वेला होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मुंबई-कानपूर आणि पुणे-जबलपूर दरम्यान धावणार्‍या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या फेर्‍यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा
रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरीक्त गर्दी पाहता रेल्वेने मुंबई -कानपूर – मुंबई आणि पुणे-जबलपूर-पुणे दरम्यान पूर्णत: आरक्षित साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना होळी, धुलीवंदनाच्या काळात या गाड्यांचा फायदा होणार आहे. रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना जागा उपलब्ध होणार आहे. अन्य गाड्यांना प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी राहात असल्याने कानपूर, जबलपूर या दोन्ही गाड्यांना वाढवून दिलेली मुदत वाढ ही प्रवाशांच्या सोईची होणार आहे.

या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
गाडी क्रमांक 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक 2 एप्रिल ते 1 ऑक्टोबर पर्यंत चालवण्यात येईल तर 04151 कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत चालविण्यात येईल. तसेच 02131 पुणे-जबलपूर साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी सोमवार, 28 मार्च ते 27 जुनपर्यंत चालवण्यात येईल तसेच 02132 जबलपूर-पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी ही रविवार, 27 मार्च ते 26 जूनपर्यंत चालवण्यात येईल. या गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यामध्ये काहीही बदल झाला नसल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळत प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !