जामठीत अवैध दारू विक्री बंदीसाठी निवेदन


बोदवड पोलिस प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा

बोदवड : तालुक्यातील जामठी येथेे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारूची विक्री होत असल्याने गावात अवैधरीत्या विक्री होणारी दारू बंद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी बोदवड पोलिसांना केली. रस्त्यावर तसेच गावात अनेक ठिकाणी अवैधरीत्या दारू विक्रीचा व्यवसाय जोमात असून ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याने दारूव्या व्यसनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. गरीब लोक व्यसनाधीन होत असून परीसरात दारूमुळे कुटुंबातील कर्ता पुरूषांच्या मृत्यू झाल्यामुळे अनेक लोकांच्या संसाराची राखरांगोळी होते आहे त्यामुळे परीसरात अवैध दारू विक्री करणार्‍यांवर कार्यवाही करून अवैध दारूचे धंदे बंद करावे व कार्यवाही न झाल्यास लोकशाही पध्दतीने अंदोलन करण्यात येईल, असा इशारा जामठी ग्रामस्थांनी दिला आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर जामठी येथील गावातील ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक जळगाव, आमदार चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव, तसेच तहसीलदार, बोदवड यांना देण्यात आली आहे. दरम्यान , अवैध दारू विक्रेत्यांनवर पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येते? याकडे आता लक्ष लागले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !