भुसावळात उघड्यावर रंगकर्मींनी साजरा केला रंगभूमी दिन


भुसावळ : नाट्यगृहाअभावी रंगकर्मींचा गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या हिरमोडनंतरही लोकप्रतिनिधींना जाग येत नसल्याने यंदाचा रंगभूमी दिन उघड्यावर साजरा करण्याचा निर्णय शहरातील नाट्यकर्मींनी घेतला. मंगळवारी सायंकाळी महाराणा प्रताप चौकात नटराज पूजन करून रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कलावंत तुषार जोशी यांनी कोणी नाट्यगृह देतं का नाट्यगृह या विडंबन नाटीकेचे तर कला शिक्षक राजेंद्र जावळे यांनी काव्यातून शहरातील कलावंतांच्या न्याय्य मागणीचा उहापोह केला.

विडंबनात्मक नाटिकेचे सादरीकरण
शहरात अनेक वर्षांपासून नाट्यगृहाची मागणी रंगकर्मींनी केली आहे, मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे सातत्याने दूर्लक्ष होते. गेल्या वर्षी शहरातील कलावंतांनी गांधी पुतळ्याजवळ तर यंदा महाराणा प्रताप चौकात रस्त्यावर नटराज पूजन करुन मराठी रंगभुमी दिन साजरा केला. यावेळी जेष्ठ रंगकर्मी वसंत देवळालकर यांच्या हस्ते नटराज पुजन झाले. यावेळी शहरातील कलावंत तुषार जोशी यांनी कोणी नाट्यगृह देतं का नाट्यगृह या विडंबनात्मक नाटिकेचे सादरीकरण केले. यावेळी शहरातील रंगकर्मीचे डोळे पाणावले होते. रेल्वे स्कूलचे कलाशिक्षक राजेंद्र जावळे यांनी कवितेतून कालावंतांच्या मागणीची माहिती विषद केली. यावेळी स्नेहयात्रीचे अध्यक्ष विरेंद्र पाटील, राजेश पाटील, मुकुंद महाजन, विश्वजीत घुले, तुषार जोशी, रितेश वानखेडे, प्रदीप चौधरी, उमेश चौधरी, संजीवनी यावलकर, भारती वैष्णव, मानसी पाटील, समृध्दी पाटील, वैशाली कुलकर्णी, अजय पाटील, प्रशांत पाटील, उमेश चौधरी, हरिष कोळी, मयुरेश कुलकर्णी, अखिल भारतीय बहुभाषिक नाट्य परिषदचे रमाकांत भालेराव, उत्कर्ष कलाविष्कारचे अनिल कोष्टी, धर्मराज देवकर, संजय चव्हाण, श्रीराम पाटील, जुने रंगकर्मी आनंद सपकाळे, संजय तारांबळे, प्रसाद देवळालकर, पं.रविओम शर्मा, डॉ.राजेश मानवतकर आदी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !