बोदवड तालुक्यातील नुकसानीची खासदार रक्षा खडसेंकडून पाहणी
बोदवड- तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर बुधवारी खासदार रक्षा खडसे यांनी हिंगणे, चिंचखेडसीम, रेवती, येवती, जामठी परीसरात नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. प्रसंगी तहसीलदार रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी रमेश वाघ आदींची उपस्थिती होती. बोदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांचे 75 टक्के पंचनामे झालेले असून पुढील दोन दिवसात 100 टक्के पंचनामे पूर्ण करावे तसेच कुठलाही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये तसेच शेतकर्यांना 100 टक्के नुकसान भरपाई मिळावे, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या तसेच ज्या शेतकर्यांनी पीक विमा काढला असेल त्यांना विम्याचे पैसे मिळतील, असे सांगून त्यांनी शेतकर्यांना आश्वस्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, बोदवड नगरपालिकेचे गटनेते कैलास चौधरी, जिल्हा परीषद सदस्य भानुदास गुरचळ, शहराध्यक्ष किरण वंजारी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास पाटील, सईद बागवान, कृउबा समिती संचालक अनिल पाटील, कृउबा समिती संचालक शांताराम चौधरी, जळगाव दूध संघ संचालक मधूकर राणे, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, तहसीलदार रवींद्र जोगी, कृषी अधिकारी एन.सी.गाजरे, तलाठी, अधिकारी वर्ग, विजेंद्र पाटील, विजय चौधरी, जीवन राणे, सचिन राजपूत,, भरत पाटील, निलेश पाटील, सुधीर पाटील, आनंदा पाटील यांच्यासह कार्यकर्त उपस्थित होते.



