आईला भेटल्याने मोठ्या भावाचा लहान भावाने केला खून
जामन्यापाडाची घटना : खुनानंतर आरोपी पसार
शिरपूर : आईला भेटण्यासाठी मोठा मुलगा आल्याचा राग आल्याने सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील जामन्यापाडा येथे सोमवारी सायंकाळी घडली. जिकला बठळ्या पावरा (40) असे मृताचे नाव आहे. खून प्रकरणी वांगर्या पावरा यांच्या फिर्यादीनुसार जिकला बठळ्या पावरा हा पत्नीसह आई सायजाबाई वठडा पावरा हिला भेटण्यासाठी आल्याचा राग आल्याने कांजर बठळ्या पावरा (32) याने मोठा भाऊ जिकला बठळ्या पावरा (40) याच्याशी वाद घालून त्याचा खून केला. सांगवी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
