भुसावळात चाकूचा धाक दाखवून लूट


भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ दुचाकीने जात असलेल्या शेख शाहरूख शेख हसीब यांना अडवून त्यांच्या पोटाला चाकू लावून खिश्यातील दहा हजार रुपयांच्या रोकडसह मोबाईल व दुचाकी हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना 5 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता घडली होती. याप्रकरणी बुधवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेख शाहरूख हे मोटर सायकलने (एम.एच 19 डीएफ 9723) यावरून जात असतांना खडका चौफुलीवरील आयान कॉलनी गेटसमोर दुचाकीवर दोघे आले, त्यांनी शेख शाहरूख यांच्या पोटाला चाकू लावून दम भरत शेख शाहरूख यांच्या खिश्यातून 10 हजार रुपये काढून घेतले. तसेच त्याच्या जवळील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल काढून घेत त्यांची दुचाकी हिसकावली. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार हा सायकलवर आला होता. शेख शाहरूख यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक रावसाहेब कीर्तीकर, सुभाष साबळे पुढील तपास करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !