गावदेवी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी अनुप डांगे : परमबीर सिंहावरील आरोपांमुळे आले होते चर्चेत
मुंबई : सिल्वर ओक हल्ला प्रकरणामुळे पोलीस दलावर टिकेची झोड उठली असतानाच पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांची पुन्हा गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर डांगे चर्चेत आले होते.
गावदेवी निरीक्षक निलंबीत
हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांची उचलबांगडी करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गृह विभागाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

डांगे गावदेवी ठाण्याचे पोलिस निरीक्षक
दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डर्टी बन्स पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाली होती. परमबीर सिंह यांनी आरोपीच्या यादीतून एकाचे नाव काढण्यास सांगितल्याचा आरोप करत डांगे यांनी पोलीस महासंचालक, गृह विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याच डांगे यांची आता गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.