भाजपाकडून काँग्रेस आमदारांना 50 कोटींचा ऑफर -विजय वडेट्टीवार


मुंबई : शिवसेना आमदारालाही 50 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप काँग्रेसच्या आमदारांवर दबाव आणत असून त्यांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. जे फुटणारे होते ते आधीच गेल्यामुळे आमचे आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून काँग्रेसच्या आमदारांना फोन टॅप करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार फुटू नये म्हणून जयपूरला हलवण्यात आल्याच्या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले, की असे काही करण्यात आलेले नाही. जे आमदार गेले असतील ते पर्यटनासाठी गेले आहेत. दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच आता आमदारांचा घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी पक्षांनी केला आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात फोडाफोडीचा पॅटर्न रावबला जाऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आमच्या इगतपुरीच्या आमदारांना भाजपकडून फोन आल्याचा गंभीर आरोप केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !