Nawab Malik राष्ट्रवादी नेते मलिकांना धक्का : ईडीने केल्या सात मालमत्ता जप्त
Nawab Malik मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांची कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊडसह सात मालमत्ता जप्त करण्यात आल्याने राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना (Nawab Malik) धक्का बसला आहे. मलिक यांच्यावर दाऊदशी संबधित जमीन व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती.
Enforcement Directorate (ED) today provisionally attached properties belonging to Maharastra Minister Nawab Malik under the Prevention of Money Laundering Act, 2002. pic.twitter.com/G4lKl7KtDq
— ANI (@ANI) April 13, 2022

बेकायेदशीर जमीन व्यवहाराचा आरोप
3 फेब्रुवारी 2022 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमने भारत सोडल्यानंतर हसीना पारकर आणि इतर सहकार्यांच्या मदतीने तो गुन्हेगारी कारवाया करत होता. त्याचवेळी टायगर मेमनसंबंधित दहशतवाद्यासोबत मलिक यांनी बेकायदेशीर जमीन व्यवहार केल्याचा आरोप झाला. याच आरोपाखाली मलिकांना अटक केली. आता ईडीने कुर्ला पश्चिम येथील गोवावाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक मालमत्ता जप्त, उस्मानाबाद येथील 59 एकर जमीन, कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट आणि वांद्रे येथील 2 सदनिका अशा एकूण 8 मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.
नवाब मलिकांना 18 एप्रिलपर्यंत कोठडी
अलीकडेच मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक (Nawab Malik) यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच त्यांना घरचं जेवण आणि औषधं घेण्यासही न्यायालयाने परवानगी दिली आहे. ईडीने 23 फेब्रुवारीला मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. यामध्ये त्यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने कमी मीठ असलेले घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचाही अर्ज करण्यात आला होता. त्यावर मलिक यांचा वैद्यकीय अहवाल पाहून त्यांना औषधं आणि घरगुती जेवण घेण्यास परवानगी देण्यात आली.