रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीला प्रांतपालांची भेट
भुसावळ : वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने रोटरी प्रांत 3030 चे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीला भेट दिली. गत चार महिन्यांचे क्लबचे कार्य पाहून त्यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील आठ महिन्याचे नियोजन, विविध प्रकल्प विषयीचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीने हातात घेतलेल्या सर्व समाजपयोगी कार्यक्रमांचे व नियोजित प्रकल्पांचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी भरभरून कौतुक केले.
रोटरी प्रांतपालांच्या नेतृत्वाचे कौतुक
प्रास्ताविकात अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी रोटरीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि आणि पुढील आठ महिन्यात करावयाच्या नियोजनाची माहिती दिली. हरविंदर ठेठी यांनी मुसाळतांडा येथील लिटररी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. यानंतर डॉ.मकरंद चांदवडकर, विशाल ठोके, देवा वाणी व सोनू मांडे यांनी गतकाळातील प्रोजेक्ट आढावा व आगामी प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला उपप्रांतपाल अनिल अग्रवाल, उपप्रांतपाल चेतन पाटील, आमदार संजय सावकारे यांची उपस्थिती होती. रेल सिटीचे सचिव मनोज सोनार यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचे सदस्य उपस्थित होते.



