शेतकर्‍यांनो कांदा सांभाळा ! कोथळीत चक्क कांद्याची चोरी


मुक्ताईनगर : कांद्याला वाढलेल्या भावामुळे भुरट्या चोरट्यांनी चक्क तालुक्यातील कोथळी येथील शेतकर्‍याच्या शेतातून सुमारे साडेबारा हजार रुपये किमतीचा कांदा लांबवला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. कोथळी येथील शेतकरी किशोर वसंत वराडे यांच्या कोथळी शिवारातील शेत गट नंबर 60 मधील शेडमधून गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी साडेबारा हजारांचा कांदा चोरून नेला. शुक्रवारी सकाळी चोरी झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी वराडे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पोलिस पाटील संजय चौधरी यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !