हनी ट्रॅपमध्ये अडकवत व्यावसायीकाला 44 लाखांचा गंडा


पुणे : सलूनमध्ये एका तरुणीशी ओळख झालेल्या रीअल इस्टेट व्यावसायिकाला दोन तरुणींनी हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करत मागील सहा महिन्यांत सुमारे 44 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी वर्षा कोंडिबा जाधव (29) या तरुणीला अटक केली असून तिची 19 वर्षीय बहीण पौर्णिमा कोंडिबा जाधव व आकाश कोकरे या आरोपींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलिसात गुन्हा
याप्रसंगी विमाननगर परिसरातील 38 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात संबंधित तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. राहुल (नाव बदलले आहे) सप्टेंबर 2021 मध्ये विमाननगर परिसरातील रोहन मिथिला सोसायटीतील पूर्विका सलूनमध्ये गेला होता. त्याची दुकानातील वर्षा जाधव या तरुणीशी ओळख झाली. एकमेकांच्या मोबाइल क्रमांकावरून त्यांचे चॅटिंग, बोलणे सुरू झाल्यानंतर तरुणीने सुरुवातीला त्याच्याशी ओळख वाढवून प्रेमाचा बहाणा करत त्याच्याकडून कामासाठी 4 लाख रुपये उसने घेतले. त्यानंतर आणखी ओळख वाढवून त्याच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न करून त्याला वेळोवेळी ब्लॅकमेल करणे सुरू केले होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !