18 वर्षीय धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या
जळगाव : शहरातील मारोतीपेठ भागातील 18 वर्षीय धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. प्रसनजीत प्राणकिशन कबीराज (18, रा.बलिदेवागंज, जि.हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु.मारोती पेठ, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
रात्रीच्या सुमारास रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या
प्रसनजीत कबीराज हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागीर म्हणून काम करण्यासाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवार, 18 एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री 10 वाजता तो आपल्या सहकार्यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो, असे सांगून दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील अप-लाईनवरील खांबा क्रमांक 420 ते 422 दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. स्टेशन मास्तर एम.अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. मयताच्या खिशातील मोबाईल व आधाराकार्डवरून त्याची ओळख पटली. प्रसनजीत हा कुटुंबीयांचा एकूलता एक मुलगा असल्याचे सांगण्यात आले.
