भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्षपदी भुसावळचे मंगेश पाटील
भुसावळ : भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा (ग्रामीण) ची कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत महाजन तर उपाध्यक्षपदी भुसावळचे मंगेश सुभाष पाटील यांची निवड करण्यात आली. दरम्यान, ग्रामीण कार्यकारीणीत मंगेश पाटील यांच्यासह 16 पदाधिकार्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष, सोशल मिडीया संयोजक, युवती प्रमुख, आत्मनिर्भर संयोजक व सदस्य मिळून 51 पदाधिकार्यांचा समावेश आहे.
निवडीनंतर पदाधिकार्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
मंगेश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे यांच्यासह पदाधिकार्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
