भुसावळात भरदिवसा लूट : दोघे आरोपी जाळ्यात


भुसावळ : जेवणासाठी हॉटेल कोठे आहे ? याची विचारणा केल्यावर समोरच्या गल्लीचा रस्ता दाखवून दोघा तरुणांना मारहाण करून त्यांच्या जवळील 300 रुपयांच्या रोकडसह 12 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लुटण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दिनदयाल नगरात घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने गोपनीय माहितीवरून दोघा आरोपींच्या नाहाटा चौफुली भागातून गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या आहेत. ईमरान शेख महमूद शेख (18, रा.मनमाड, जि.नाशिक) व राजकुमार कडू दावडे (23, रा.नेपानगर, जि.बर्‍हाणपूर म.प्र.) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मारहाण करीत भरदिवसा केली लूट
शहरातील जामनेर रोडवरील दिनदयाल नगर समोरून गणेश अशोक दांडगे (रा. आमसरी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) व त्यांचे मित्र अंकुश रानगोते हे जात असतांना त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन युवकांना जेवणासाठी येथे हॉटेल कोठे आहे याची चौकशी केल्यानंतर आरोपींनी दिनदयाल नगरात जाणार्‍या गल्ली हात करून जाण्याचा इशारा केला. यावेळी दांडगे व रानगोते हे दोन्ही तेथे गेले असता तिन्ही युवकांनी दोघांना मारहाण करीत त्यांच्या जवळील 300 रुपये रोख व दोन मोबाइॅल असा 12 हजार 300 रुपयांचा ऐवज लांवबला होता. याप्रकरणी गणेश दांडगे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.




अवघ्या काही तासात आरोपी जाळ्यात
गुन्ह्याच्या अवघ्या काही तासानंतर पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, नाईक चंद्रकांत बोदडे, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास उपनिरीक्षक सरीता कोळपकर, रवींद्र तायडे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !