मनुर खुर्दच्या विवाहितेवर अत्याचार


बोदवड : तालुक्यातील मनुर खुर्द येथे विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयीत आरोपी आशिष प्रकाश जोशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेच्या तक्रारीनुसार आरोपीने गेल्या सहा महिन्यांपासून वेळोवळी धमकी देत विवाहितेचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केला तर 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पीडीतेच्या घरात घुसून पतीसह मुलांना मारून टाकण्याची धमकी देत चामडी पट्ट्याने मारहाण करीत पीडीतेवर अत्याचार केला. आरोपी आशिक प्रकाश जोशी याच्या विरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात भादंवि कलम 376, 354, 448, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !