अजाण सुरू असताना गाणे लावल्याने रेल्वेच्या उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा


Crime against a railway sub-inspector for singing while unknowingly performing मुंबई : देशात भोंग्यावरून वातावरण तापले असताना औरंगाबादमध्ये रेल्वेच्या उपनिरीक्षकाने अजाणदरम्यान गाणे लावल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबादच्या सातारा पोलिस ठाण्यात शनिवारी चिथावणीखोर कृती केल्याचा ठपका ठेवत किशोर गडप्पा मल्कूनाईक या रेल्वे पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावातील 22 वर्षीय तरुणीवर आठ वर्षांपासून अत्याचार : भुसावळातील चार आरोपींना अटक

तक्रारीनंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
रेल्वे सुरक्षा बलातील फौजदार किशोर मलकूनाईक हे सध्या परळी येथे कार्यरत आहेत. शनिवारी नमाजच्या वेळी त्यांनी समोरच्या इमारतीमधून मशिदीच्या दिशेने लाऊडस्पीकर लावून त्यावर हनुमान चालियासह इतर धार्मिक गाणी लावली. पोलिसांना ही बाब समजताच जबाबदार पदावर असतानाही दोन धर्मात शत्रुत्व वाढेल आणि एकोप्यास बाधा होईल, सार्वजनिक शांतता भंग होऊन लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे कृत्य केले म्हणून फौजदार मलकूनाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. ही घटना शनिवारी सायंकाळी सिल्क मिल्क कॉलनीत घडली.


चाकूच्या धाकावर चाळीसगावातील गॅस एजन्सीतून साडेचार लाख लांबवले


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !