नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी भोंग्यांबाबत घेतला हा निर्णय


नाशिक : नाशिकचे तत्कालिन आयुक्त दीपक पाण्डेय यांनी भोंग्यांबाबत काढलेले आदेश आयुक्त नाईकनवरे यांनी रद्द केले आहेत. राज्याच्या गृह विभागाने आणि पोलिस महासंचालक कार्यालयाने यापूर्वी काढलेले आदेशच योग्य असून नवे आदेश काढण्याची गरज नसल्याचे नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

असे होते आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. हे भोंगे उतरवा नाही तर मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे राज्यात त्याची मोठी चर्चा होत आहे. त्याच अनुषंगाने नाशिक पोलिस आयुक्तांनी आदेश काढले होते. त्यात म्हटले होते की, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी मशिदींच्या १०० मीटर परीसरात हनुमान चालिसा पठण करण्यावर बंदी आहे तसेच येत्या ३ मे पर्यंत भोंगे लावण्यासाठी आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे, त्यानंतर आयुक्तांनी आदेश काढले की, ज्या मशिदींवर भोंगे लावले आहेत त्यांच्या आवाजाची तीव्रता मोजली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) द्वारे ध्वनीमापक यंत्र वापरले जाणार आहेत. या यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता मोजण्याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या भोंग्यांची तीव्रता अधिक आढळेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आता परवानगी घेऊनही मर्यादेपेक्षा अधिक आवाज असणाऱ्यांना दंड आणि शिक्षा होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते.


 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !