रावेरमध्ये 16 पासून रंगपंचमी व्याख्यानमाला


रावेर : शहरात रंगपंचमी व्याख्यानमालेला शनिवार, 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. शनिवार, 16 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कॅप्टन स्मिता गायकवाड, मुंबई यांचे ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर व्याख्यान तर रविवार, 17 नोव्हेंबरला पुणे येथील निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन हे ‘काश्मीर काल, आज आणि उद्या’ या विषयावर, सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी पुणे येथील चारूदत्त आफळे ‘संतांचे समाज प्रबोधन’ या विषयावर, मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले हे ‘स्पर्धा परीक्षा आणि आजचा युवक’ या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधतील तर बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प अकोला येथील डॉ.सतीश फडके ‘भरकटणार्‍या संस्कृतीची दशा आणि दिशा’ या विषयावर गुंफतील. ही सर्व व्याख्याने सरदार जी.जी.हायस्कूलमधील गोपालदास शिवलाल अग्रवाल रंगमंचावर होणार आहेत. रोज सायंकाळी साडेसहा वाजता होतील. या व्याख्यानमालेत श्रोत्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती व्याख्यानमालेचे अध्यक्ष विठोबा पाटील, सचिव अनिल महाजन यांनी केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !