डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री : मेशो वेबसाईटविरोधात गुन्हा


जळगाव : डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ऑनलाईन गर्भपाताच्या औषधींची विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मेशो आणि औषधींचा पुरवठा करणार्‍या एस.एस.ट्रेडर्स (साऊथ दिल्ली) या संस्थेविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अनधिकृतपणे औषधांची विक्री
बेकायदेशीपणे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ‘मेशो’ या ऑनलाईन वेबसाईटसह इतर वेबसाईटवर गर्भपाताच्या औषधींची विक्री करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. ऑनलाईनवरून गर्भपातासाठीच्या औषधांचा पुरवठा झाल्यास त्याचा दुरूपयोग होऊन महिलांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे याची पडताळणी करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी केली होती. त्यानुसार जळगाव अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मुळे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने मेशो या अ‍ॅपवर 29 मार्च रोजी गर्भपाताच्या औषधांची मागणी नोंदविली.



डिलेव्हरी बॉयमार्फत मिळाली औषधी
ऑर्डर नोंदविल्यानंतर 3 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता त्या औषधी डिलेवरी बॉयमार्फत प्राप्त झाल्या. त्यानंतर मुळे यांनी औषधींचे बिल तपासले असता त्यांना ही औषधी मेशो अ‍ॅपमार्फत ए.एस.ट्रेडर्स, खिजराबाद, न्यू फ्रेंड्स कॉलनी, न्य लायन्स हॉस्पीटल, साऊथ दिल्ली यांनी विक्री केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी सोमवार, 2 मे रोजी या प्रकाराबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर एस.एस.ट्रेडर्स व मेशो कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हळद कार्यक्रमातच उपवराचे विवाहितेशी अनैतिक संबंधाचे बिंग फुटले : आरोपीला पोलिसांनी केली अटक

 

मुलाच्या मृत्यूने व्याकुळ झालेल्या पित्यानेही केली आत्महत्या : यावल शहरातील घटना


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !