अभोण्यातील लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात


Abhona Police station ACB Trap नाशिक : दाखल गुन्ह्यानुसार न्यायालयात पुढील प्रक्रिया न होण्यासाठी दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी केली करणार्‍या कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस स्टेशनमधील हवालदार रमण तुळशीराम गायकवाड यास दोन हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली.

चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणार्‍या पतीला आजन्म कारावास



दोन हजारांची लाच भोवली
दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अभोणा येथील एका कुटुंबाचे त्यांच्या नातेवाईकांशी भांडण झाले होते. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानुसार आपापसातील वाद मिटविले. या प्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार न्यायालयात पुढील प्रक्रिया न होण्यासाठी दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे संबंधितांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) कळविली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार हवालदार गायकवाड याने अभोणा पोलिस स्टेशनमध्येच 2 हजार रुपयांची लाच स्विकारली.

जळगाव मनपाच्या पहिल्या महिला आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !