रीधोरी गावात घरकुलांना मिळावी मंजुरी
वंचित बहुजन आघाडीची गटविकास अधिकार्यांकडे मागणी
यावल : तालुक्यातील वढोदा प्र.सावदा ग्रामपंचायतीतील रीधोरी वॉर्ड क्रमांक एक येथील गावातील सुमारे 30 कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित असल्याने प्रशासनाने दखल घेवून घरकुल मंजूर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे यावलचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची ही असेल भूमिका : मंत्री छगन भूजबळांनी स्पष्ट शब्दात सांगितले
तर 1 जूनपासून उपोषण
सुमारे 30 कुटुंबांकडे स्वतःचा उतारा असून ते कुड-मातीच्या घरात राहत असून पाणी-पावसाळ्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. घरकुलापासून वंचित असलेल्या कुटूंबांना हक्काचे घरकुल मिळवू द्यावी, अशी मागणी वंचित आघाडीने केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास 1 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा वंचित आघाडीचे यावल तालुका महासिचव राजेश ओंंकार गवळी, आय.टी.जिल्हाप्रमुख सचिन बार्हे, जिल्हा सचिव दीपक मेघे, अरुण भालेराव, तालुका उपाध्यक्ष भगवान मेघे, अमोल तायडे, आशा सोनवणे आदींनी दिला आहे.

