कुसुंब्याच्या तरुणाचा अपघाती मृत्यू


जळगाव :  दगडावर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात कुसुंबा गावातील तरुण जागीच ठार झाला. गुलाब नवल बाविस्कर (38, रा. इंदिरानगर, कुसुंबा) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गोदावरी महाविद्यालय परीसरात चाकूच्या धाकावर दहशत : आरोपी जाळ्यात 

दुचाकी दगडावर आदळल्याने अपघात
जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील गुलाब नवल बाविस्कर (38, रा.इंदिरानगर कुसुंबा) हे गुरुवार, 5 मे रोजी रात्री 11 वाजता एमआयडीसीतून महामार्गाकडे दुचाकी (एम.एच.19 बी.डी.1925) ने जात असताना गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ त्यांची दुचाकी दगडावर आदळल्याने गुलाब यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे, रमेश चौधरी, गणेश शिरसाळे यांच्यासह तेजस खाचणे या नागरीकाने घटनास्थळी धाव घेत गुलाब यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी करीत त्याला मयत घोषित केले.



आधारकार्डावरून पटली ओळख
खिशातील आधारकार्ड व मोबाईलवरून मृताची ओळख पटली. पोलिसांनी मृताच्या वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. गुलाब यांचा पाईप तयार एमआयडीसीत कारखाना असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन मुले असा परीवार आहे.

माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील म्हणाले : ग्रीन एनर्जीच्या विविध प्रकल्पांसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण 450 कोटींचा निधी मंजूर


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !