नातेवाईकांच्या लग्नास आलेल्या पाडळसे गावातील प्रौढाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला


फैजपूर : नातेवाईकांकडे लग्नासाठी आलेल्या पाडळसे गावातील प्रौढ व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गजानन दामू भोळे (55, पाडळसा, ता.यावल, ह.मु.अंबरनाथ, मुंबई) असे मयताचे नाव आहे.

भुसावळ शहरात उद्या भीमगीतांचा कार्यक्रम : उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती 

घरातच आढळला मृतदेह
गजानन भोळे हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. पाडळसा येथे लग्न असल्याने ते अंबरनाथ येथून गावाला रविवार, 8 मे रोजी नातेवाईक यांच्याकडे विष्णू बाळू भोळे यांच्या घरी आले होते. लग्न असल्याने लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गावातील न्हावी बुधवार, 11 मे रोजी सकाळी विष्णू भोळे यांच्या घरी आले असता त्यांनी आवाज दिल्यानंतर आतून कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजा ढकलून पाहिले असता त्यांना दुर्गंधीचा वास आला. त्यांना एक कुजलेला मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार लक्षात आला. हा प्रकार लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली. फैजपूर पोलिस ठाण्याचे पोलिसांनी धाव घेवून पंचनामा केला. याबाबत विष्णू भोळे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक फौजदार सुधाकर पाटील करीत आहे.

भुसावळ नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आठ हरकती दाखल 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !