आर्थिक विवंचनेतुन पातोंडीतील शेतकऱ्याची आत्महत्या
रावेर : तालुक्यातील पाथर्डी येथील शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
पातोंडी, ता.रावेर येथे किशोर श्रावण पाटील (४०) हे सकाळी स्वत:च्या शेतात गेले व तेथे काहीतरी विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. मयत किशोर पाटील यांच्या पश्चात एक मुलगा असुन तो ही कर्णबधीर आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीक घटना स्थळाकडे धाव घेतली. आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केली असावी असा कयास उपस्थित नागरीक लावत होते.