घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्याला अटक
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे शिवारातील तेजस पार्क येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मच्छिंद्र लक्ष्मण पवार (रा.तेजस पार्क, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
कारवाईने उडाली खळबळ
आव्हाणे शिवारातील तेजस पार्क येथील तरुण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलिसांनी 2 घरगुती गॅस सिलेंडरसह गॅस भरण्याचे मशीन असा 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक सुशील पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मच्छिंद्र पवार या तरुणाला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.







