नाहाटा चौफुली ते चोरवडदरम्यानच्या रस्त्याच्या डागडूजीला सुरुवात


भुसावळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभागात येणार्‍या भुसावळातील नाहाटा चौफुली ते चोरवड, यावल नाका ते आमोदा, सावदा ते रावेर या रस्त्यांच्या कामांची निकृष्ट पद्धत्तीची कामे झाल्याने अल्पावधीतच दुरवस्था झाली. या संदर्भात शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन नंदवणे यांनी पुराव्यांसह तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाने दखल घेत नाहाटा चौफुली ते चोरवड या रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे.

तक्रारीची गांभीर्याने दखल
शहरातील नाहाटा चौफुली ते चोरवड, यावल नाका ते आमोदा, सावदा ते रावेर हे रस्ते खड्डेमय झाले आहेत. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन नंदवणे यांनी पुराव्यांसह तक्रार केली होती. या कामाच्या संदर्भात निकृष्ट कामांची माहिती, फोटो आणि चित्रीकरण उत्तर विभागाकडे दिले होते मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयात तक्रार केल्यानंतर कार्यासन अधिकारी सु.दि.पाष्टे यांनी जळगावच्या अधीक्षक अभियंत्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रयत्न करणे भाग पडले आहे. बांधकाम विभागाने आता शहातील नाहाटा चौफुली ते चोरवड दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !