मुंबई-नागपूरसाठी विशेष ट्रेन


भुसावळ : रेल्वे गाड्यांना वाढलेली गर्दी पाहता मुंबई ते नागपूर दरम्यान विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्रमांक 02031 मुंबई-नागपूर विशेष गाडी शनिवार, 16 रोजी 12.20 वाजता सुटल्यानंतर तर 2.10 वाजता नागपूरला पोहोचल. परतीच्या प्रवासात अप 02032 नागपूर-मुंबई गाडी रविवार, 17 रोजी 5.30 वाजता नागपूरहून सुटल्यानंतर दुसर्‍या 6.15 वाजता सीएसटी रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगांव, वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी-टू टियर, थ्री एसी थ्री टियर, 13 स्लीपर क्लास, सहा जनरल डबे जोडण्यात येणार आहे. 15 नोव्हेंबरपासून ऑनलाईन तसेच पीआरएस स्थानावर बुकींग उपलब्ध होणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !