चिंता मिटली : केरळात मान्सुनचे आगमन : महाराष्ट्रात ‘या’ तारखेला बरसणार !
जळगाव : घामाच्या धारांनी भिजलेल्या त्रस्त नागरीकांसाठी आनंदाची बातमी आहे. रविवारी केरळात मान्सूनचे आगमन झाले असून वेळेपूर्वीच मान्सुन बरसण्याचा अंदाज आता खरा ठरला आहे. याची माहिती हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटकरून दिली आहे. दरम्यान, पोषक वातावरण राहिले तर मान्सून 7 ते 8 जून पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
सात दिवसांपूर्वीच मान्सून दाखल
यंदा सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला. त्यानंतर केरळमध्ये तो 27 मे पर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला होता, मात्र काही दिवसांपासून मान्सून श्रीलंकेत खोळंबला होता त्यामुळे 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार्या मान्सूनला विलंब लागला. दरम्यान, रविवार, 29 मे रोजी केरळातील पर्जन्यमापकांची तपासणी केल्यानंतर हवामान विभाग या निकषावर पोहचला असून केरळात मान्सूनचे आगमन झाले आहे.

बैलगाडीवर भरधाव दुचाकी धडकली : कंडारीच्या तरुणाचा मृत्यू
आगामी सात दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार मान्सुन
दरम्यान, मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण झाले असून हंगामाच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये त्याचे तळकोकणात आणि महाराष्ट्रात आगमन होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा सर्वकाही वेळेवर होणार असल्याचे संकेत आहेत. यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याच प्रमाणे मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात केरळात मान्सून पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता 8 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात सक्रीय होईल यामध्ये शंका नाही.
वाहने पेटवून 18 लाखांचे नुकसान केल्यानंतर माथेफिरू अडकला पोलिसांच्या जाळ्यात
