भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात
भुसावळ : शहरातील मरीमाता मंदिराजवळ एका संशयीताजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यावरून शहर पोलिसांनी सापळा रचून दीपक राजू कोळी (21, रा.जुना सतारा, कोळीवाडा, भुसावळ) या संशयीताच्या सोमवारी सायंकाळी 5.40 वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून दहा हजार रुपये गावठी कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.अली सैय्यद, हवालदार आशा तडवी, पोलिस नाईक सुनील सैंदाणे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सोनवणे, समाधान पाटील, मोहन पाटील, भूषण चौधरी, विशाल साळुंखे आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार मो.अली सैय्यद करीत आहेत.
