जळगाव महापालिकेचा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
गाळ्याचा कर कमी करण्यासाठी स्वीकारली 4100 रुपयांचा लाच
जळगाव : जळगाव महापालिकेच्या कर्मचार्याला गाळ्या कर कमी करण्यासाठी चार 100 रुपयांची लाच स्वीकारतांना मंगळवारी जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली. चौकीदार विलास भिका पाटील (55, गिरणा पंपींगजवळ, जळगाव) असे अटकेतील कर्मचार्याचे नाव आहे. तक्रादार यांचा पिंप्राळा परीसरात गाळा असून त्यापोटी असलेला कर कमी करून देण्यासाठी विलास भिका पाटील (55) मंगळवारी चार हजार 100 रुपये लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई डीवायएसपी जी.एम.ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव, नाईक मनोज जोशी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, हवालदार सुरेश पाटील आदींच्या पथकाने केली.
