श्रीकृष्णा कॉलनीतील बोलेरो गाडी चोरट्यांनी लांबवली


शिरपूर : शहरातील श्रीकृष्णा कॉलनीमधून बोलेरो गाडी अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना 30 मे 2022 रोजी उघडकीस आली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांचोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कियामोद्दीन नियाजोद्दीन शेख (रा.मदीना मोहल्ला, शिरपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात सोमवार 6 जून 2022 रोजी सायंकाळी तक्रार दाखल केल्यानंतर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर शहर पोलिसात गुन्हा
शहरातील मदिना मोहल्ला येथे राहणार्‍या कियामोद्दीन नियाजोद्दीन शेख राहणार मदीना मोहला शिरपूर यांनी परीवाराच्या उदरनिर्वाहसाठी बोलेरा (एम.एच.18 ए.जे.4881) गाडी घेतली होती. सदर वाहन हे खाजगी भाडे तत्वावर व प्रवासासाठी वापर करीत होते. सदर गाडीवर तात्पुरत्या स्वरुपात बदली म्हणून शेख नफिसशेख मुस्ताक (श्रीकृष्णा कॉलनी, शिरपूर) हा चालक म्हणून होता. गाडीला वर्दी असल्याने 30 मे रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास यांचा मुलगा जुनेद कियामोद्दीन शेख याने चालक शेख नफिसशेख मुस्ताक याच्या घरासमोर लावुन लॉक करून गाडीची चाबी चालक नफिसशेख मुस्ताक याच्या ताब्यात दिली होती. वर्दी असल्याने चालक शेख नफिसशेख मुस्ताक पहाटे चार वाजता उठून बोलेरो वाहन पाहिले असता त्याला सदर वाहन दिसून आले नाही. त्याने आजुबाजुला शोध घेतला असता परंतु मिळून आली नसल्याने मालकास माहिती दिली.शोध घेऊन हज अद्याप गाडी मिळुन आली नसल्याने शेख यांनी सोमवारी चार लाख रुपये किंमतीची गाडी चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली. शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार लादुराम चौधरी करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !