रेल्वे उत्तर रीक्षा स्टॉपवरील विद्युत पुरवठा खंडित केल्याने रीक्षा बंद : भुसावळात प्रवाशांचे हाल
रीक्षा चालक संतप्त : रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा सहा.आयुक्तांना निवेदन
भुसावळ : रेल्वेच्या उत्तर विभागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रीक्षा स्टॉपवर लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डाचा विद्युत पुरवठा रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी कट केल्याच्या निषेधार्थ रीक्षा चालकांनी मंगळवारी रात्री पासून तर बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत रीक्षा बंद ठेवल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनाल हाल झाले. वीजपुरवठा सुरळीत ठेवावा या संदर्भात रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक आयुक्त दीक्षीत यांना निवेदन देण्यात आले.
अचानक वीजपुरवठा कट
रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला असलेल्या रीक्षा स्टॉपवर भव्य डिजिटल फलक लावण्यात आला असून त्याला रेल्वेतर्फे आतापर्यंत रेल्वे प्रशासनाने वीजपुरवठा केला होता मात्र मंगळवारी हा वीजपुरवठा कट करण्यात आल्याने रीक्षा चालक संतप्त झाले त्यांनी रीक्षा बंद ठेवत रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवला. बुधवारी दुपारीदेखील तीन वाजेपर्यंत रीक्षा बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या संदर्भात जळगाव जिल्हा ऑटो रीक्षा चालक-मालक युनियनचे जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे, स्टॉप अध्यक्ष शैलेंद्र अहिरे व उपाध्यक्ष नितीन धनेधन यांनी रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाचे सहा.आयुक्त दीक्षीत यांना निवेदन दिले. रीक्षा स्टॉपवर अंधार झाल्याने अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली तसेच प्रवाशांना अंधारामुळे पैसे देताना गैरसोय होणार असल्याचे म्हणणे मांडण्यात आले तसेच भविष्यात काही अप्रिय घटना रेल्वे उत्तर रीक्षा स्टॉपवरील विद्युत पुरवठा खंडित केल्याने रीक्षा बंद : भुसावळात प्रवाशांचे हाल घडल्यास त्यास रेल्वे प्रशासन जवाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.



