बोदवडसह मुक्ताईनगर दहा कोटींच्या विकासकामांना मंजुरी

मराठा समाजाला दिलेल्या वचनाची आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून पूर्ती


मुक्ताईनगर : मुक्ताईनगरसह बोदवड तालुक्यातील मराठा समाजाला दिलेल्या वचनांची पूर्ती करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी दोघेही ठिकाणी शहरात प्रत्येकी 70 लक्ष रुपये खर्चाच्या भरीव निधीसह भव्य छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह मंजूर करून आणले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विशेष सूचनेनुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना मंजुरी दिली आहे. मुक्ताईनगर, बोदवडसह सावदा येथील विविध पायाभूत व विकासकामांना भरीव निधीच्या तरतुदीसह मंजुरी दिली आहे. मतदारसंघातील एकूण 10 कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

खामखेडा पुलावरील अप्रिय घटना टळणार
खामखेडा पुलावर आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले असल्याने आमदार पाटील यांनी या ठिकाणी जातीने लक्ष देवून येथे संरक्षण जाळी उभारणीसाठी 60 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे शिवाय लवकरच गणपती उत्सव व दुर्गोत्सव विसर्जनापूर्वी उपाययोजना करून संरक्षण जाळी उभारण्यात येईल.
सावदा येथील सोमेश्वर नगरातील रहिवाशी तसेच सूरज परदेशी यांच्या मागणीनुसार येथे सुमारे 255 लक्ष निधीची भरीव तरतूद करून या परिसरात डांबरीकरण व मजबुतीकरण कामांसाठी देखील मंजुरी मिळवण्यात आली आहे.

या कामांना मिळाली मंजुरी
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.12 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करणे,
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत भवानी माता मंदिराजवळ सुशोभिकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.15 मध्ये खुली जागा विकसित करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील आस्था नगरी ते संत मुक्ताई मंदिराकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक एकमधील बालाजी टॉकीज ते हनुमान मंदिरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक दोनमधील भवानी मंदिरामागील जुन्या कब्रस्थानमागे रस्ता काँक्रिटीकरण करणे, नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक तीनमधील अकबर शहा ते जनार्दन बोदडे व कडू चांभार ते उर्दू शाळेपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक चारमधील अयुब पिंजारी ते मुजाहिद ड्रायव्हर यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक सहामध्ये मुक्ताई झेरॉक्स आस्था नगरीच्या नाल्यापर्यंत गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक सातमधील काठोके यांच्या दुकानापासून ते संजू काळे यांच्या घरापर्यंत व दामू धनगर यांच्या घरासमोरून ते हनुमान मंदिरापर्यंत व सुनील केशव भालेराव यांच्या घरासमोरून ते सचिन सुरवाडे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.12 मध्ये पर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 14 मध्ये आरसीसी गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 15 मधील खिरळकर अप्पा ते डी.जी.पाटील व जोगी ते मितेश ढेले व चिमकर गुरुजी ते समर्थ हॉलपर्यंत दुतर्फा आरसीसी गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये आरसीसी गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमाकंक 12 मध्ये उद्यान विस्तारीकरण करणे, मुक्ताईनगर येथे नगरपंचायत हद्दीत पूर्णा नदी पुलावर संरक्षण जाळी बांधकाम करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.1 मधील भिल्ल वस्तीमध्ये गल्ली बोळात पेव्हर ब्लॉक बसविणे व आरसीसी गटार बांधकाम करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक एकमधील ग्रामीण रुग्णालयापासून ते वराडे यांच्या घरापर्यंत ते सत्य नारायण शर्मा यांच्या घरापर्यंत ते किशोर तायडे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आरसीसी गटार बांधकाम करणे व रस्ता काँक्रीटीकरण करणे,
बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक सहामधील महाकाल चौक ते जवरी मेलांडे ते सुरज सारवान यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक नऊमधील जामठी रोडवरील स्मशानभूमी जवळील मेंबर कॉलनीत रस्ता काँक्रीटीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 16 मधील युसूफ ठेकेदार यांच्या घरापासून ते जीवन माळी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.17 मधील शफी मिजवान ते नुरा मण्यार यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत मोहन कोल्हे ते रामधन पारधी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे व आरसीसी गटार बांधकाम करणे,
बोदवड नगरपंचायत हद्दीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ सुशोभीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत शिवद्वाराजवळ सुशोभीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीत अमर हॉटेल ते मलकापूरकडे जाणार्‍या रस्त्याचे दुभाजाकासह सुशोभीकरण करणे व पथदिवे उभारणे, सावदा नगरपरीषद हद्दीत विविध ठिकाणी चौक सुशोभीकरण करणे, सावदा नगरपरिषद हद्दीत सोमेश्वर नगरमध्ये विविध ठिकाणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे आदी कामे मंजूर झाली आहेत.

नोकरीच्या शोधार्थ आलेल्या 19 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !