रावेर रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांवर कारवाईची संक्रांत
406 प्रवाशांकडून दोन लाख 24 हजार 825 रुपयांचा दंड वसुल
भुसावळ : मध्य रेल्वेच्या रावेर स्थानकावर रेल्वे प्रशासनान बुधवारी अचानक धडक तिकीट तपासणी मोहिम राबवल्याने फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा, सहाय्यक वाणिज्य प्रबधंक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेत 406 प्रवाशांकडून तब्बल दोन लाख 24 हजार 825 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याने फुकट्या प्रवाशांमध्ये मोठी तारांबळ उडाली.
33 तिकीट निरीक्षकांचा समावेश
विशेष मोहिमेत तिकीट चेकींग स्टॉपचे 33 तिकीट निरीक्षक व सात रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्यांचा समावेश होता. विना तिकीट प्रवास करणार्या 92 प्रवाशांकडून 62 हजार 870 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तसेच जनरल तिकीटावर स्लीपर डब्यातून प्रवास करणार्या 314 प्रवाशांकडून एक लाख 61 हजार 955 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही मोहिम मुख्य तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी केली.



