ऊर्जा विभागात वंचित कंत्राटदारांनाही कामाची समान संधी मिळावी : बाविस्कर

खडका येथे झाला वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचा विभागस्तरीय मेळावा


भुसावळ : महानिर्मिती, वितरण आणि पारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये निघणार्‍या विविध कंत्राटामध्ये वंचित कंत्राटदारांना आर्थिक समांतर वाटा मिळावा, असे मत दीपनगरचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांनी मांडले. खडका येथे झालेल्या वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या हस्ते पिंपळाचे झाड लावून झाले. अध्यक्षस्थानी खडका गावचे सरपंच तथा पारेषण कंपनीचे झोन अध्यक्ष विलास सपकाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य सचिव प्रकाश तायडे, उपाध्यक्ष मन्साराम कोळी, कोषाध्यक्ष संतोष तेलंग, सहसचिव नारायण झटके, संघटक उस्मान पठाण उपस्थित होते. यावेळी बावस्कर म्हणाले की, वीजनिर्मिती केंद्रात काही मोजक्याच कंत्राटदारांची मक्तेदारी सुरु आहे. आपल्या कामात इतर कोणी वाटेकरी येवू नये म्हणून तेथे सोयीनुसार नियम आणि अटी तयार केल्या जातात, असा आरोप केला. सर्कल कार्यकारिणीची निवड झाली. मेळावा यशस्वी करण्यासाठी सुरेश सरोदे, धना महाजन, भैय्या महाजन, जगदीश राऊत, सुरेश टाक, वसंत धांडे, संजय अडकमोल, मनोज पाटील, शांताराम इंगळे यांनी मेळाव्यासाठी सहकार्य केले.
खडका येथे झालेल्या वंचित कंत्राटदारांच्या मेेळाव्याचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या हस्ते पिंपळाचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले. खडका येथे झालेल्या वंचित कंत्राटदारांच्या मेेळाव्याचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या हस्ते पिंपळाचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !