किनगावच्या शेतकर्‍याच्या विहिरीत पडल्याने मृत्यू


यावल : तालुक्यातील किनगाव येथील शेतकर्‍याचा तोल गेल्याने विहिरीत बुडून मृत्यू झाला. याबाबत यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय रामदास पाटील (50, किनगाव, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.

तोल गेल्याने विहिरीत बुडाल्याने मृत्यू
संजय पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते व रूईखेडा शिवारातील शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होते. गुरूवार, 16 जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यानंतर ते विहिरीजवळ आले व याचवेळी त्यांचा तोल गेल्याने विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. संजय पाटील हे विहिरीत पडल्याचे पाहून नातेवाईकांनी ओरडाओरड केली. तरूणांच्या मदतीने त्यांना बाहेर काढल्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषीत केले. ललित विठ्ठल पाटील (52, दहिगाव, ता.यावल) यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुल करीत आहे.

कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक : पूरनाड फाट्याजवळ चौघे कारवाईच्या कोठडीत


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !