रावेरात बायोमायनिंग प्रकल्प पुढील आठवड्यात सुरू होणार


मुख्याधिकार्‍यांसह संचालकांनी केली प्रकल्पस्थळाची पाहणी : मालेगावच्या कंपनीला पालिकेने दिला ठेका

रावेर : शहराच्या स्वच्छतेंगर्गत गोळा केल्या जाणार्‍या कचर्‍यापासून वर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत बायो मायनिंग प्रकल्पास पुढील आठवड्यात सुरुवात होणार असून या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या नियोजनासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे व लक्ष्मी सेल्स कार्पोरेशनचे संचालक दिग्विजय बच्छाव यांनी प्रकल्पस्थळी जाऊन पाहणी केली.

खत निर्मितीसाठी पुढाकार
शहरात दररोज गोळा होणार्‍या कचर्‍याचा सर्वत्र मोठा प्रश्न निर्माण झाल्याने यावर प्रभावी उपाय म्हणून घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवून त्या माध्यमातून कचर्‍याचे विघटन व प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मितीसाठी शासनाने पुढकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून येथील नगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत असलेल्या बायोमायनिंग प्रकल्पास पुढील आठवड्यात सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. यासाठी मालेगाव येथील लक्ष्मी सेल्स कार्पोरेशन प्रा.लि. या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. यासाठी शासनाने 93 लाखांचा निधी नगरपालिकेला दिला आहे. हा निधी खर्चून 21 हजार क्युबिक मीटर कचर्‍याचे बायोमायनिंग केले जाणार आहे.




पुढील आठवड्यात प्रकल्प कार्यान्वीत
नगर पालिकेतर्फे दररोज गोळा झालेला कचरा या प्रकल्प स्थळावर जमा करण्यात आलेला आहे मात्र सतत पाऊस राहिल्याने या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र पुढील आठवड्यापासून या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. यासाठी लागणारी मशिनरी, अवजारे येण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहेत. मशिनरीचे सुटे भाग आणून ते प्रकल्प ठिकाणी जोडून मशीन प्रक्रियेसाठी कार्यरत करण्यात येईल. यासाठी अत्यावशक असलेला वीज पुरवण्यासाठी नगरपालिकेतर्फे स्वतंत्र फिडर बसविण्यात आलेले आहे. नगरपालिकेने टाकलेल्या कचर्‍याचा प्रथम एका ठिकाणी ढीग तयार करण्यात येईल. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खोदुन सर्व कचरा एकत्र केला जाईल. या कचर्‍यातील लोखंड, काच, दगड गोटे, प्लास्टिक हे मशिनरीच्या सहाय्याने प्रथम वेगळे केले जातील. त्यानंतर त्यावर बायोकल्चर औषधाची फवारणी करण्यात येईल. हा कचरा 21 दिवसापर्यंत कुजणार आहे व त्यानंतर बायोमायनिंग प्रक्रिया मशिनरीच्या सहाय्याने करण्यात येईल. या प्रक्रियेतून खताची निर्मिती होणार असून कंपनीतर्फे त्याची विक्री करण्यात येणार आहे. बायो मायनिंग


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !