Sangli Family Suicide धक्कादायक : एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांची आत्महत्या


Family 9 Members Suicide In Sangli By Consuming Poision सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील चक्क नऊ सदस्यांनी आत्महत्या केल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन केल्याचे सांगण्यात आले. आर्थिक कारणांमुळे हे कुटुंब तणावात असल्याचीही चर्चा आहे. सुरुवातीला या सगळ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले जात होते मात्र हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत होते. त्यामुळेच या कुटुंबाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

यांचा मृतांमध्ये समावेश
मृतांमध्ये डॉ.माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

राज्यात उडाली खळबळ
म्हैसाळ येथील डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई,पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा व्हनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक व्हनमोरे, मुलगा आदित्य माणिक व्हनमोरे, पुतण्या शुभम पोपट व्हनमोरे यांनी राजधानी हॉटेल जवळ तर दुसर्‍या घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा व्हनमोरे,संगीत पोपट व्हनमोरे, मुलगी अर्चना पोपट व्हनमोरे याच्या घरात मृतदेह आढळून आले आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलिस अधीक्षक अशोक वीरकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी फौजफाटा घेऊन भेट देत पंचनामा केला.

अपघात सत्र कायम : जळगावात भरधाव ट्रालाच्या धडकेने पाळधीतील दुचाकीस्वार ठार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !