अग्निपथ योजनेला विरोध : भुसावळात लोहमार्ग पोलिसांचे पथसंचलन
भुसावळ : मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरू असून बिहारमध्ये सर्वाधिक मौठा फटका रेल्वेला बसला आहे. सोमवार, 20 रोजी देशभर भारत बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर आंदोलनाचा धोका लक्षात घेता जंक्शन स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे शिवाय लोहमार्गचे निरीक्षक विजय घेर्डे यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचार्यांनी रेल्वे स्थानकासह परीसरात व आऊटरवर सशस्त्र पथसंचलन करीत लक्ष वेधले.
200 कोटींचे नुकसान
अग्निपथ योजनेला असलेला विरोध पाहता उत्तर मध्य रेल्वेच्या माणिकपूर जंक्शनच्या पुढे रेल्वे गाड्या जात नसल्याने दानापूरकडे जाणार्या रेल्वे गाड्या या ईटारसी स्थानकावरच थांबविण्यात आल्या. उत्तर भारतात काही रेल्वे स्थानकांवर तोडफोड केल्याने आणि प्रवासी डबा पेटवून दिल्याने भुसावळ जंक्शनवर सुध्दा दक्षता घेतली जात आहे. बिहारमध्ये आतापर्यत 50 प्रवासी डबे पेटवून देण्यात आले आहे तर पाच इंजिने सुध्दा आंदोलकांनी जाळली आहे. यात रेल्वेचे 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भुसावळ विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांवर पोलिस व आरपीएफचा बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून रेल्वे स्थानकावर 24 तासांची गस्त सक्त करण्यात आली आहे. श्वान पथकाकडून सुध्दा स्थानकावर तपासणी केली जात आहे. मुसाफिर खाना, प्लॅटफॉर्म, वेटींग रूम, ब्रिज आदी ठीकाणी गस्त वाढवण्यात आली आहे शिवाय विभागात जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, मनमाड, नाशिकरोड, अकोला, खंडवा, बर्हाणपूर अमरावती आदी ठीकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

सीसीटीव्हीची नजर
भुसावळ रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरपीएफ हे रेल्वे स्थानकावरल सर्वच प्लॅटफॉर्म सह रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वार, परीसर, रीक्षा थांबे यावर लक्ष ठेऊन आहेत, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील आरपीएफ, जीआरपी पोलिसांची संख्या दोन दिवसांपासून वाढवली आहे. अधिकारी व कर्मचारी नित्याने कॅमेर्याच्या माध्यमातून लक्ष ठेवत आहे.