24 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : पारोळा तालुक्यातील घटना
24-year-old married woman sexually assaulted : Incident in Parola taluka पारोळा (29 जून 2026) : पारोळा तालुक्यातील एका गावाच्या धरणाच्या पाणलोट परिसरात 24 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शुक्रवार, 26 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी रोशन दादाभाऊ मराठे (चाळीसगाव तालुका) विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री केला अत्याचार
24 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, 26 रोजी रात्री 12.30 वाजता ती लघूशंकेसाठी उठल्यानंतर संशयीत आरोपी रोशन मराठे याने पीडीतेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार पीडीतेने पतीला सांगितल्यानंतर रविवार, 28 रोजी पारोळा पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय योगेश महाजन करीत आहेत.


