Shivsena Leader Eknath Shinde महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? एकनाथ शिंदे 13 आमदारांसह गुजरातमध्ये
Shivsena Leader Eknath Shinde मुंबई : राज्यसभेनंतर विधान परीषदेतही भाजपने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का दिल्यानंतर राज्यात मोठा भूकंप होणारी बातमी समोर आली आहे. विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde) हे त्यांच्या गटातील 13 आमदारांसह नॉट रीचेबल सर्व लोकप्रतिनिधी हे गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आल्याने शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या शक्यता बळावल्या आहेत तर महाविकास आघाडी सरकार राहणार की कोसळणार? याबाबत राजकीय मंथन सुरू झाले आहे.
महाविकास आघाडीचे आमदार फुटले
विधान परीषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे दोन उमेदवारही अगदी काठावर पास झाल्याने आघाडीचे अनेक आमदार फुटल्याचे बोलले जात असतानाच शिवसेनेचे तब्बल 13 आमदार गुजरातच्या सुरतमधील हॉटेल मेरीडीयनमध्ये आहेत. हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती असून गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचें समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचेही समोर आलं आहे.

अनेक आमदार नॉट रिचेबल
शिवसेनेचे राज्यातील काही आमदार हे नॉट रीचेबल असून त्यात उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणमधील 2 आमदार सोबत आहे. ठाण्यातील 2 आमदार सोबत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
राजकीय भूकंपाची भीती
सोमवारी मंत्री एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde) आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.