मंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्रकार परीषदेतून मांडणार भूमिका


मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला असून शिवसेनेतील नाराज आमदार सुरतमध्ये दाखल झाले असून मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासेाबत आता 35 आमदार सोबत असल्याचा दावाही होत आहे. मंत्री शिंदे हे मंगळवारी दुपारी आपली पत्रकार परीषदेत भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. सुरतमधील मेरीडिअन हॉटेल बुक झाले असून शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा होत आहे. या आमदारांनी शिवसेना भाजपासोबत गेल्यास आम्ही तुमच्यासोबत राहू असेही म्हटल्याचे समोर येत असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

आमदारांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी
शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी मिळत नाही, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांना हा निधी दिला जातो. यावेळी आमदारांना विश्वासातही घेतले जात नाही. याच्या तक्रारी उद्धव ठाकरेंकडे केल्यावर त्याची दखलही घेतली जात नाही, अशा तक्रारी शिवसेना आमदारांच्या होत्या. या सार्‍या वातावरणातच राज्यसभेला शिवसेनाचा उमेदवार पडला, याची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

अनेक आमदार सुरतमध्ये
एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री पोहोचलेल्या आमदारांमध्ये रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल हे आहेत. या आमदारांना शिंदे यांनी मोठया प्रमाणात विकासनिधी दिला आहे. दुसरीकडे राजन विचारे, रविंद्र फाटक हे ठाण्यातच आहेत. प्रताप सरनाईक यांचा फोन मात्र नॉट रिचेबल येत आहे.

पत्रकार परीषदेतून भूमिका येणार समोर
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? एकनाथ शिंदे 11 आमदारांसह गुजरातमध्ये 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !