Sharad Pawar एव्हढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही : शरद पवारांचा सवाल
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी पाहता आघाडी सरकार केव्हाळी कोसळण्याची शक्यता असतानाच मुंबईत आघाडी सरकारमध्ये सातत्याने बैठका सुरू झाल्या आहेत. बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत सिल्व्हर ओकवर बैठक घेत एव्हढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?, असा सवाल शरद पवारांनी (Sharad Pawar) उपस्थित करत गृह खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आघाडी सरकार कोसळणार ! : संजय राऊत यांचे सूचक ट्वीटद्वारे संकेत
मंत्री शिंदे यांचा 40 आमदार सोबत असल्याचा दावा
गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे व पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत. ही संख्या 40 असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. तसेच गटनेते पदाचा दावा करण्यासाठी शिंदे गोव्याला जाण्याची शक्यता होती मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा पदभार अद्याप सोपवण्यात आला नसल्याने ऑनलाईन बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचवेळी भाजपाचे आमदारही संख्याबळ दाखवून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.


सर्व आमदार स्वखुशीनं इथे : राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu)
आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही, असं म्हटलं. सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे, असे बच्चू कडू म्हणाले.