भुसावळात 24 रोजी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी


भुसावळ : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 15 वी 14 वर्षाच्या आतील पाचवी खुल्या (सिनियर) गटातील मुला-मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा अमरावती येथे 6 ते 8 डिसेंबबर 2019 दरम्यान होणार आहे़ या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड रविवार, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ऑडनेस फॅक्टरी (ईगल) मैदान, पीओएच वर्कशॉपच्या मागे भुसावळला तर दुपारी अडीच वाजता व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे मैदान, रावेर येथे होणार आहे.

खेळाडूंना उपस्थितीचे आवाहन
1 ऑक्टोबर 2005 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटनेचे अध्यक्ष प्रा.आ.चंद्रकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, संघटनेचे उपाध्यक्ष शकील पटेल, डॉ.प्रदीप तळवलकर, प्रा.संजय चौधरी, प्रा.राजेश अंजाळे, प्राचार्य निना कटलर, रमण भोळे, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, राजू कुलकर्णी, मधुकर वाणी, अजय डोळे, खुशाल देशमुख, प्रा.आसीफ खान, गोपाल जोनवाल, मेघशाम शिंदे, राहुल कोळी, प्रतीक कुलकर्णी, चेतन वानखेडे, तारीख अहमद यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !