शिवसेनाप्रमुखांना रेल कामगार सेनेतर्फे अभिवादन
भुसावळ : रेल कामगार सेनेच्या कार्यालयात शिवसेना प्रमुख व रेल कामगार सेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमीत्त रेल कामगार सेनेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ललितकुमार मुथा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. रेल कामगार सेनेची स्थापना करून रेल्वेतील मराठी कामगारांना धीर दिला आहे. रेल्वे कर्मचार्यांच्या समस्या दूर करण्यासाठी रेल कामगार सेना आजही सक्रीय आहे. असे त्यांनी मनोगतात सांगितले. यावेळी प्रदीप भुसारे, अब्दुल अजीज, प्रतिम टाक, कमलाकर बाणाईत, मंगू शेलोडे, राकेश पाठक, मोहन राजपूत, विरकुमार मम्मैया, विनोद वाघे, शेख शकील, रमेश मराठे, गौतमकुमार, राजेश प्रसाद, रोशन मिस्तरी, शेख इक्बाल, मंगेश बोरोले, महेंद्र सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
