Uddhav Thackeray उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले : मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही


Uddhav Thackeray मुंबई : महत्वाकांक्षा असावी पण अशी नसावी की ज्यानं दिले त्यालाच खावं, तुम्हाला आमदार घेऊन जायचे आहेत घेऊन जा…आणखी कुणाला जायचं असेल त्यांनीही जा. जे गेले ते माझे कधीच नव्हते असं मी समजेन. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले. शिवसेना भवनावर शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख आणि इतर महत्वाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही
शिवसेनेत उलथापालथ झाल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना संबोधित केलं. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, अशी सुरुवात करत उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) आता थेट मैदानात उतरुन बंडखोरांना इशारा दिला आहे.



त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही
ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंड नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. सेनेची मूळे आज माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंमत माझ्या रक्तात हे मोदींनाही सांगितलंय
मी माझ्या मानेचं ऑपरेशन केलं तेव्हा मोदींनी मला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं हिंमत माझ्या रक्तात आहे. पहिलं ऑपरेशन ठिक होतं. पण ऑपरेशननंतर दुसर्‍या दिवशी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या शरीराच्या काही भागांच्या हालचाली बंद पडल्या आहेत असं जाणवू लागलं. त्यामुळे दुसरं ऑपरेशन करावं लागलं. याकाळातही विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच महिने मी कुणाला भेटू शकलो नाही. त्याचा असा फायदा घेतला जात आहे. मी त्यादिवशी सगळं मनातलं बोललो आजही बोलतो. मला शब्द देऊन गेले. तिकीट कापले तरी एकनिष्ठ राहिन म्हणणारे तिकडे गेले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमच्या मुलाला मोठे केलेले चालते मग माझ्या मुलाला का नाही ?
आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का. आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालते, तुम्हाला तुमच्या मुलाला मोठे करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का ? या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता डोक्यात हाणणार, असं रोखठोक विधान करत उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !