Satish Mahale शिवसेनेच्या धुळे महानगर प्रमुख पदाचा सतीश महालेंचा राजीनामा : एकनाथ शिंदेंना समर्थन
Satish Mahale resigns as Shiv Sena’s Dhule metropolitan chief: Support to Eknath Shinde धुळे : राज्यातील ठाकरे सरकारमध्ये आलेल्या राजकीय भूकंपानंतर तालुका व जिल्हास्तरावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. धुळ्यातील शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेल्या सतीश महाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास पाठींबा देऊन महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं सतीश महाले यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
बेताल वक्तव्याचा निषेध : सावद्यासह मुक्ताईनगरात खासदार राऊतांच्या पुतळ्याचे दहन
धुळ्यातील पहिले राजीनामा सत्र
माजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ धुळे जिल्ह्यातील हे पहिलं राजीनामास्त्र आहे. साधारण दीड वर्षांपूर्वीच सतीश महाले यांची धुळे महानगर प्रमुख म्हणून निवड झाली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात सतीश महाले म्हणतात सध्याच्या राज्यातील चालेल्या राजकीय घडामोडींना अनुसरून नमूद करू इच्छितो की, मागील काळात वेळोवेळी मला आलेल्या राजकीय , सामाजिक अडचणींमध्ये, संकटसमयी एकनाथ शिंदे हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तेव्हा पासून मी सतत त्यांच्या संपर्कात आहे म्हणून सद्य परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा देऊन मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला असल्यानं मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला जागून माझा महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, तो आपण स्वीकार करावा. असे सतीश महाले यांनी उद्धव ठाकरेंना लिहलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

